"श्रीराम नवमी"!
दिनविशेष ...
आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजे "श्रीराम नवमी"!
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
आज प्रभू रामचंद्र ह्यांचा जन्मदिवस. भगवान विष्णू ह्यांचा हा सातवा अवतार.
रामायण हा इतिहास आहे.... काल्पनिक कथा नव्हे ...
शिकण्यासारखे बरेच काही ...
रामायणाचा कितीही अभ्यास केला तरी कमीच आहे परंतु तो आपल्या हिंदुस्थानाचा भव्य इतिहास आहे. [fiction नाही] महत्वाचे असे खूप काही आहे पण त्यातल्या विशेष विचार करण्यासारख्या गोष्टी इथे पाहू ...
१. रामायणात विमानाचा उल्लेख आहे ... विशेष म्हणजे ती पाऱ्यावर (Hg - Mercury) कार्य करणारी प्रणाली होती.
२. राम-सेतू हा तर समुद्रावर बांधलेला सेतू ! civil engineering at its best !
३. रामायण आपणास हे सुध्दा शिकविते की युद्ध, शत्रूच्या भूमीवर उत्तम ... त्यामुळे आपल्या भूमीचे, लोकांचे हाल होत नाहीत.
४. कर्तव्य ते कर्तव्य - आजही आपण 'राम-राज्य' हवे असे म्हणतो.
५. युद्ध हे योग्य रणनीतीने जिंकता येते. फक्त मोठं सैन्य असून पर्याप्त नसते.
६. प्रभू रामचंद्र आपल्या शत्रूंचा वेळीच वध करायचे. (वेळ वाया दवडला तर शत्रू बलाढ्य होतो व अधिक क्लेश होतात)
७. अहिंसा स्वकीयांसाठी असते - शत्रूसाठी नव्हे ! योग्य वेळी धनुष्य-बाण वापरलाच पाहिजे. (पुढे, श्री कृष्णाने हीच शिकवण दिली आहे ...स्वकीयांसाठी बासरी, पण शत्रूसाठी मात्र सुदर्शनचक्रच)
म्हणून ...
एक शिक्षक म्हणून मला नेहमी वाटतं की हा तेजस्वी इतिहास मुलांना शिकविलाच पाहिजे. Our history books should showcase our rich culture and history.
ज्याने खून करून, लूट करून राज्य बळकाविले त्यांच्याविषयी खूप आहे, पण थोरल्या भावाचे राज्य आहे, असे म्हणून सिंहासन ग्रहण न करणाऱ्याविषयी काही नाही ...?!